• गझल प्रभात • (भाग १३४ )
![]() |
गझलकार गणेश भुते |
🌹मला पुन्हा हरवायचे नव्हते🌹
सरीला मुक्त जर बरसायचे नव्हते
तिने स्वप्नात माझ्या यायचे नव्हते
तुझ्या स्वप्नात मन गुंतायचे नव्हते
तसे नशिबात माझ्या व्हायचे नव्हते
क्षमा केली तुला अन् मुक्त झालो मी
मला ह्रुदयात सल ठेवायचे नव्हते
कुणी घेईल संशय, काळजी होती
असे नव्हते, मला भेटायचे नव्हते
पुन्हा मुद्दाम होते मौन बाळगले
खरे कारण तुला दुखवायचे नव्हते
धुक्याची वाट नंतर टाळली होती
मला तेथे पुन्हा हरवायचे नव्हते
गणेश भुते
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments