• गझल प्रभात • (भाग १२९ )
![]() |
गझलकार प्रमोद खराडे |
🌹 ती लाही लाही आहे 🌹
मी येथे आहे कारण मी तेथे नाही आहे
मी अजून आहे येथे हे काही बाही आहे
जे बोलायाचे होते ते बोलुन झाले सारे?
का अजून बोलायाचे बाकीही काही आहे
मी जगूनही ना जगलो, मी वेळेवर ना गेलो
मी असतानाही नव्हतो, मी नसतानाही आहे
ती दर्प तिच्य्या वर्णाचा सांभाळत जगली तेव्हा
त्या तेव्हाही मी होतो, अन् मी आताही आहे
जो शब्द रेखला मी तो, हे कातळ कोरत गेला
जे तुम्ही गिरवले सारे ते काही नाही आहे
प्रेमाच्या वाटेवरती डोळ्यांना सौख्य पुरेसे
हृदयास विचारू जाता ती लाही लाही आहे
प्रमोद खराडे
पुणे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments