• गझल प्रभात • (भाग २२४ )
![]() |
गझलकार संजय कुळये |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹चालले ऋतू वाया🌹
पारिजातापरी तुझी काया
पाहतो दव बनून बिलगाया
सूर माहीतही जरी नव्हते
लागलो गीत मी तुझे गाया
आठवण नेहमी तुझी येते
लागते रात्र रोज बहराया
तू नवे शोधलेस नभ-तारे
अन मला लावलेस भटकाया
पौष माघातली कुठे थंडी
पेटली आग! कोण विझवाया?
जो किनारा मला हवा होता
लागलो तो तुलाच समजाया
का कळ्या या अशा मुक्या झाल्या
का असे चालले ऋतू वाया
संजय कुळये
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments