• गझल प्रभात • (भाग १३८ )
![]() |
गझलकारा दिपाली वझे |
🌹द्यावी हिरवळ अपुल्याकडची🌹
गझल चांगली कसरत आहे तारेवरची
दाद मिळाली पाहिजे तिला रसिकांकडची..
झाडांवरची पाने पिवळी पडली बहुधा
साठवलेली द्यावी हिरवळ अपुल्याकडची..
फुलांवाचुनी इथे पाखरू फिरकत नाही
रोज मनाला छळे आठवण वाड्यावरची..
पतंगासवे क्षणात जुळले नाते अपुले
हिवाळ्यातली ठेव साठवण गच्चीवरची..
भरवण्या हवे घास "दिपाला" वात्सल्याचे
ताटात जरी भाकर असली गरिबाघरची..
दिपाली महेश वझे
बेंगळूरू
मो. 9714393969
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments