• गझल प्रभात • (भाग ११९ )
![]() |
गझलकार विजय वडवेराव |
🌹फक्त कागदी विमान झालो🌹
तुला बिलगलो स्मशान झालो
गजले पुरता महान झालो
वाट लागली आयुष्याची
जगा वाटले तुफान झालो
थेंब थेंब तू लुटला माझा
समुद्र होतो तहान झालो
दुनियेसाठी मलम जरी मी
कुठे स्वतःचे निदान झालो
मीच काढले मला विकाया
जुने पुराणे दुकान झालो
आई नंतर मुलगी आली
पुन्हा नव्याने लहान झालो
गगनभरारी फसता कळले
फक्त कागदी विमान झालो
विजय वडवेराव
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments