• गझल प्रभात •(भाग १२० )
![]() |
गझलकारा डॉ स्वाती घाटे |
🌹युगे झाली तरीही चालली घरघर🌹
बघू शकणार नाही मी प्रखरअंबर
झरोक्यातून दाखव चांदवा सुंदर
नको इतके तुझे उपकार माझ्यावर
मला जमते तसे मी चालविन हे घर
कधी शिजते कुणाची डाळ का लवकर
मिसळ साखर ..पुरण मउशार झाल्यावर
दळण दळणे तिचे थांबेल की नाही
युगे झाली तरीही चालली घरघर
अजुन ओलीच होती …स्वच्छ पुसलेली
लगेचच टाकला का पाय लादीवर
रिता झालास शिंपुन चार शिंतोडे
नको घालूस खोटी पावसा फुंकर
इथे उलटीच गंगा वाहते हल्ली
स्वतः प्रश्नास शोधत हिंडते उत्तर
दिवस ढळला तरीही वाटतो नवथर
असे तो लावुनी गेला मला अत्तर
डॅा. स्वाती घाटे
जयपूर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments