• गझल प्रभात • (भाग १३१ )
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹पोर्णिमेचा चंद्र वेडा🌹
पोर्णिमेचा चंद्र वेडा साद घालत राहिला
तू असावे सोबतीला नाद गुंजत राहिला
गीत तू संगीत तू आनंद होता तूच तू
आठवांचा रंग गहिरा खोल पसरत राहिला
का अचानक एकटीला सोडुनी गेलास तू
शेवटाला तू दिसावा जीव तडपत राहिला
तारकांनी आज आहे मौन त्यांचे सोडले
चंद्रमाही प्रेमरंगी तेज मिरवत राहिला
सावराया लागले मी अंतरीच्या यातना
वेदनेचा पूर नयनी संथ वाहत राहिला
सौ. नेहा महाजन
सचिव
गझल मंथन साहित्य संस्था सोलापूर जिल्हा
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments