🌹गझलेतील शेर रसिकाच्या मनात रेंगाळत राहिला पाहिजे🌹
गझलमंथन संस्थेचे दिनांक 11/2/2024 चे गझल संमेलन त्यातील टापटीप, सुव्यवस्था, आपलेपणा, अगत्य , नेटके सूत्रसंचालन, रूचकर अल्पोपहार व जेवण , वेळेचे नियोजन यामुळे नेहमीच लक्षात राहिल . या सर्व गोष्टींचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे
20 जून 2018 रोजी मी गझल मंथनची पहिली कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आता गझल मंथन समुहाची 24 कार्यशाळा सुरू आहे. पहिल्या कार्यशाळेपासून ते आतापर्यंतचा, या गझल संमेलनापर्यंतचा गझल मंथन सोबत केलेला प्रवास आनंददायक आहे. नाशिकचे गझल संमेलन म्हणजे 'आनंदाचे डोही, आनंद तरंग' असेच होते. संमेलनातील सगळे वातावरण आनंद . उत्साह,तत्परतेने भारलेले होते. रांगोळीपासून ते स्टेजपर्यंतची सगळी व्यवस्था अगदी चोख होती.वेळेचे व्यवस्थापन उत्तम होते. गझल कार्यशाळेतील गझल साधक ते यशस्वी गझलकार व धडाडीचे कार्यकर्ते हा साधकांचा आलेख फारच आनंद देणारा आहे.
या गझल संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.शिवाजी काळे,उद् घाटक डाॅ.आशिष मुजुमदार ,प्रमुख पाहुणे जयवंत वानखेडे तसेच सर्व गझलकार , गझल मंथनची खान्देश कार्यकारिणी टीम व सर्व गझलरसिक श्रोते, वार्ताहर, फोटोग्राफर व अनेक सहकारी यांच्या उपस्थितीत हा गझल संमेलनाचा सोहळा अतिशय सळसळत्या उत्साहाने व आनंदाने पार पडला.डाॅ. शिवाजी काळे यांनी यांनी आपल्या भाषणात गझल कार्यशाळेची आवश्यकता स्पष्ट केली व गझल मोठी झाली पाहिजे असे ते म्हणाले डाॅ, आशिष मुजुमदार यांनी गझल रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गझलेला सुयोग्य गायनाची साथ हवी असे सांगितले. जयवंत वानखेडे यांनी गझल मंथनच्या कार्याचा आढावा घेतला.
गझलसंमेलनाच्या दुसर्या मुशायर्यातील अध्यक्षीय भाषणात मी म्हणाले की गझलेतील अनुभव हा गझल वाचणार्याला वा ऐकणार्याला आपलासा वाटला पाहिजे .जे मला वाटते तेच गझलकाराने अचूक मांडले आहे असे वाटले पाहिजे,गझलेतील एखादा शेर वा मिसरा रसिकाच्या मनात रेंगाळत राहिला पाहिजे , हेच अशा संमेलनातून झाले पाहिजे.
या गझल संमेलनात काशीनाथ गवळी सर, मृणाल गीते व यशश्री रहाळकर यांचा गझल यात्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
आपल्या गझल कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचा असा सत्कार पाहून फार आनंद झाला. गझल मंथनचे संस्थापक अनिल कांबळे यांच्या अथक परिश्रमाने व योजकतेने गझल मंथनकडून गझलेचा प्रसार होत आहे त्यांची अनुपस्थिती या संमेलनात फारच जाणवली. गझल मंथनचे हे कार्य असेच चालत राहो. पुन्हा एकदा गझल मंथन खांदेशविभाग कार्यकारिणी मंडळ यांच्या कार्याची वाहवा केल्याशिवाय रहावत नाही. कार्यक्रमाचे फोटोही छान आले आहेत. माईक व्यवस्थाही छान होती . एकूणच सर्व कार्यक्रम देखणा व दीर्घकाळ लक्षात रहाण्यासारखा झाला. या संमेलनास विशेष अतिथी म्हणून मला बोलवण्यासाठी धन्यवाद. असेच कार्यक्रम निरनिराळ्या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी शुभेच्छा!
उर्मिला बांदिवडेकर
0 Comments