• गझल प्रभात •
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹स्वभाव🌹
आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही
प्रेमाविण पण कसे जगावे सराव नाही
तिने दिलेला गुलाब साधा मला भावला
तिच्यापुढे काट्यांचा काही टिकाव नाही
ह्रदयावरती कोरुन झाले नाव तिचे अन
तिच्यावरी पण माझा काही प्रभाव नाही
संध्याकाळी कधी भेटतो निवांत तेव्हा
सांगत बसतो उशिरा येणे बनाव नाही
चिडणे कुढणे पूर्वी वाटे मजेमजेचे
राग पाहुनी तिचा समजले निभाव नाही
सौ. मानसी मोहन जोशी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments