• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹चित्रास नंतर एक चौकट काढली🌹
यामुळे तर सवय एकांतास माझी लागली
भावली असणार त्याला प्रेयसी माझ्यातली
सारखे कोषात जाणे आवडत आहे मला
जगरहाटी सांगते ही सवय नाही चांगली
आजही तो सांजवेळी एकटा होता कुठे?
आजही तुळशीत त्याने एक पणती लावली
कंच हिरवे स्वप्न गेले होत राखाडी पुढे
झाड शोधत राहिली मग पाखरे डोळ्यातली
प्रेम वाटत राहिला आहेस कायम तू इथे
पण निसर्गा! माणसांना माणसे वैतागली
उंच आकाशात उडता एक पक्षी काढला
आणि त्या चित्रास नंतर एक चौकट काढली
वांझ आहे पण तरीही देत आहे सावली
त्याच फांदीला तिने झोळी मुलाची बांधली
वैशाली माळी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments