Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तुझ्यावर जीव जडल्यावर Gazalkar Ajay Birari

• गझल प्रभात •   



🌹तुझ्यावर जीव जडल्यावर🌹


करत होते बरी चर्चा असेतो प्रेत सरणावर

कुणाला काय हो त्याचे जगी या मीच नसल्यावर


मला धिक्कारले ज्यांनी तयांचा सोहळा आहे

किती सजवून झोपवले बघा त्यांनीच मेल्यावर


कुणी रडतात दुःखाने कुणी रडतात हर्षाने

दुखवट्याचा मुखवटा लेउनी जाती स्मशानावर


किती मी पाहिले होते मनाशी स्वप्न जगण्याचे

मनाचे काय झाले पण, तनाची राख झाल्यावर


नभालाही रडू आले तुझा रे अंत झाल्यावर

उतरले पीक जोमाने बळीचा जीव गेल्यावर


न माझा राहिलो मी अन जगाचे भान ना उरले

असा सैराट झालो मी तुझ्यावर जीव जडल्यावर


मतांसाठी किती हुजरे गिरी केली पुढाऱ्यांनी

विचारी ना अजयला ते पुन्हा निवडून आल्यावर


अजय बिरारी 

नाशिक

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments