• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹दु:खा..🌹
सखा होऊन माझा तू जरी मज जाळतो दु:खा,
तिची तू भेट आहे रे म्हणूनच पाळतो दु:खा -
किती आनंद होतो ना सखी स्वप्नात आल्यावर ?
तिथे येतोस बेटया अन तिच्यावर भाळतो दु:खा -
तुला नाही म्हणूनी मी निघूनी जात नसतो रे,
तसे केल्यास तू आसव कसे मग ढाळतो दु:खा ? -
जराशी वेल बहरू दे तिच्याही आठवांची तू,
बहर येताच आधी का असा चुरगाळतो दु:खा ? -
तुझी ईर्ष्या नसे मजला नसे शत्रुत्वही काही,
तुला अपुलाच मानूनी असा कुरवाळतो दु:खा -
अविनाश कासांडे
सुपेकर. गंगाखेड.
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments