Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी काळाकातळ केला Gazalkar Sunanda Bhavsar

 • गझल प्रभात •   

मी काळाकातळ केला


🌹मी काळाकातळ केला🌹


व्याख्येत सुखाच्या आता, मी मुळीच अडकत नाही 

सौख्याचा पण एखादा, क्षणसुध्दा गमवत नाही 


मेल्यावर देहाची तर, होणार शेवटी राखच

देहाचे दान करावे, हे अजून उमजत नाही!


मरणाची धमकी कारे, देतोस मला आयुष्या...?

मी जिवंत की मेलेली...हे मलाच समजत नाही


मी काळाकातळ केला, माझ्याच मनाचा कारण...

झुळझुळता निर्मळ निर्झर, मुरुमातुन उसळत नाही !


गुरफटून घेतो आम्ही, दुःखात स्वतःला इतके...

की सुखद, सुगंधी क्षणही, आम्हाला सुखवत नाही !


सौ. सुनंदा भावसार

नंदुरबार

मो. 90963 49241

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments