• गझल प्रभात •
![]() |
Gazalkar Avinash patil |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹असे काही घडो देवा🌹
असे काही घडो देवा नदीचा पूर व्हावा मी
तहानेला मिटायाला धरेचा नूर व्हावा मी
कुणीही घेतली नाही खुशाली झोपडीला या
भुकेने गार झालेल्या चुलीचा धूर व्हावा मी
असा धाडायचा पाऊस अवकाळी कसा येथे
पिकाच्या पंचनाम्याला किती आतूर व्हावा मी
सुखी तू ना बळीराजा कधीही पाहिला येथे
लढाई सारखी चाले शहीदा शूर व्हावा मी
सरी ज्या लांबल्या जेव्हा जळाले शेत हे माझे
ऊभे बाधांवरी नेते जरा काहूर व्हावा मी
डॉ. अविनाश पाटील
पनवेल
_______
अल्प परिचय
डॉ. अविनाश पाटील
(एम.ए.पीएचडी.डीसीए)
संशोधन अधिकारी
जल संपदा विभाग मंत्रालय मुंबई (निवृत्त)
प्रकाशित साहित्य
काव्य संग्रह:5_ अनवट वाटा, ॠतू बहरताना , अन्वय, खलाटी वलाटी. माहौल (गझल संग्रह) मनाचा एक रिकामा कप्पा (आगामी गझल संग्रह)
कांदबरी:2 वस्ती नसलेले गाव, दर्या दौलत (मराठा आरमारा वरील ऐतिहासिक कादंबरी..
कथासंग्रह 2 व अन्य ललित लेखन मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात SYBA कथा कविता समाविष्ट
कोकण मराठी साहित्य परिषदेचा नेरूरकर पुरस्कार, राजा राजवाडे पुरस्कार व कुसुमाग्रज राजभाषा पुरस्कार अन्य अनेक पुरस्कार प्राप्त..
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments