• गझल प्रभात •
🌹 निर्धार 🌹
शक्ती पुरी पणाला, मी लावणार आहे
दुष्टांस जाळण्याला, मी पेटणार आहे
साधेपणास येथे, अजिबात वाव नाही
दमदार झुंज द्याया, सरसावणार आहे
पाळून जातपाती, झाले भले कुणाचे?
सीमा दुरावणाऱ्या, ओलांडणार आहे
नशिबास दोष नाही, देणार मी कधीही
जीवन प्रयत्न करुनी, साकारणार आहे
धर्मात व्यर्थ स्पर्धा, सांगा हवी कशाला?
हृदयात प्रेम साऱ्या, मी पेरणार आहे
क्षण एक एक माझा, योजील कार्य करण्या
निर्धार ठाम चित्ती, नित राहणार आहे
बुध्दास मानतो मी, पण युध्दही प्रसंगी
योजून सर्वकाही, जग जोडणार आहे
काशीनाथ महाजन
नाशिक
मो. ९८६०३४३०१९
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments