• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹सत्कार्य आपले ते संतापरी असावे🌹
आरोग्य मानवाचे पाण्यापरी असावे
जीवंत राहणे हे सोन्यापरी असावे
गर्विष्ठ मानवाचे हे वागणे चुकीचे
सामर्थ्य आपले ते रामापरी असावे
दुष्कार्य मानवाला नरका समान आहे
सत्कार्य आपले ते संतापरी असावे
खोटेच मानवाला खाईत लोटणारे
सत्यासवे जपावे धर्मापरी असावे
देहात रक्त सारे रंगीत क्षार नाही
ते रक्त मानवाचे भीमापरी असावे
निलेश भुडे
कोरपणा, चंद्रपूर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments