Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

प्रभू आभार आहे Gazalkar Sharad Raut

• गझल प्रभात •   

प्रभू आभार आहे


🌹प्रभू आभार आहे🌹


  इंद्रिये सारीच दर्जेदार आहे    

 पोटभर मिळते प्रभू आभार आहे


सृष्टिचा जो चालला संहार आहे

माणसांचा हा नवा अवतार आहे


भावही देतील त्यांचा नेम नाही

आजचे हे मोसमी सरकार आहे


बंद झाल्यावर जगाचे दार कळले

पाखरांचा मोकळा संसार आहे


अन्नपाण्याला विषारी लोभ खातो

ही फळातिल अमृताची हार आहे.


शरद मा. राऊत 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments