• गझल प्रभात •
🌹सुगंधी जखम 🌹
सुगंधी जखम रोज सलते जिव्हारी
तुझी जिवलगा मखमली ही उधारी
प्रमुख कारभारी न झालो कधीही
तिच्या संगती राहिलो मी प्रभारी
कधी हारलो ना जुलूमाविरोधी
मला जिंकण्याची खुणवते खुमारी
जिभेचे उसळणे तपासून ठेवा
चटक जर तिला वागण्याची दुधारी
मती नासली मतलबी माणसाची
बदलतो जणू रंग सरडा विषारी
पुन्हा राजधानीत झाली तयारी
तुझा मेंदु गिळण्यास टपले मदारी
इथे काजव्यांचा धुमसतो दरारा
तुला जर दिवा फुंकण्याची बिमारी
निशांत गुरू
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments