• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹भोवताली पाहिजे अस्तर तुझे 🌹
केवढे हे दूर आहे घर तुझे
कर जरासे तू कमी अंतर तुझे
घे जवळ नंतर मला, मग लाड कर
पण जरा डोळे तरी आवर तुझे
मी तुझ्या आहे मिठीतच बघ जरा
केवढे झालेत कातर स्वर तुझे
प्रेमही राहील या धरतीवरी
आणि नाही गीतही नश्वर तुझे
बिलगल्यावरती निरोपाच्याक्षणी
उमटते अंगावरी अक्षर तुझे
साद ओठांनी जराशी घातली
मिरवले ओठांवरी उत्तर तुझे
झोकुनी देते स्वत:ला ज्या क्षणी
त्या क्षणी होती सुरू मोहर तुझे..
चांदणेही पोळते आहे मला
भोवताली पाहिजे अस्तर तुझे
प्रमोद खराडे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments