• गझल प्रभात •
🌹पावलांचे ठसेही पहावे🌹
कधी असे तर तसेही पहावे
झरऱ्यात काळे खडेही पहावे..
असेल दोषी कुणी या जगाचा
अबोल ते आसवेही पहावे..
मिळेल नक्की तपासून घ्यावे
नि फाटलेले खिसेही पहावे..
उदास झालेत जगणे मनाचे
सभोवताली ससेही पहावे..
उपास तापास जप तप करावे
नि पावलांचे ठसेही पहावे..
दिपाली महेश वझे
बेंगळूरू
मो. 9714393969
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments