• गझल प्रभात •
![]() |
गझलकार शांताराम हिवराळे |
🌹मानव इथला🌹
खरेपणाला किंमत नाही सदासर्वदा वाटत असते
गुंडगिरीच्या तालावरती दुनिया सारी नाचत असते
वाटेला बघ फुटती वाटा अवतीभवती नित्य पहारा
वळणावरती कानोसा घे मुक्कामावर पाळत असते
प्रदूषणाची दाट सावली शहराला पण घातक ठरते
धुके दाटले काळे काळे प्राणावरती साचत असते
गर्दीत इथे माणूस असा एकाकी का सदा वाटतो?
प्रश्नाला बघ उत्तर नाही मनास चिंता कोरत असते
काजळ काळी रात वादळी कुठे आसरा माहित नाही
काळोखाची काळी चादर लख्ख विजेने फाटत असते
किती हावरा मानव इथला माझे माझे सदैव म्हणतो
पेल्यामधला थेंब तळाशी जीभ बिचारी चाटत असते
इथले येणे जाणे शेवट काय घेतले काय राहिले?
आयुष्याच्या पोकळ गप्पा हरेक व्यक्ती मारत असते
शांताराम हिवराळे
पिंपरी, पुणे
मो. 9922937339
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments