Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

फुलासारखा जीव कोमेजणे Gazalkara Alka Kulkarni

• गझल प्रभात •   



🌹फुलासारखा जीव कोमेजणे 🌹


किती श्वास आहे असे राहिलेले कशाला पुन्हा जन्म हा मागणे

उगा व्यर्थ चिंता व्यथा काळजीने फुलासारखा जीव कोमेजणे


जरी डोंगराएवढे दुःख व्हावे तरी प्रेम आहेच जगण्यावरी

अशा जीवनाची हमी ना तरीही जिणे जोवरी श्वास सांभाळणे


कुठे जाऊ देहास ह्या त्यागताना कशी सोडवेना मला लालसा

सुखाच्या तृषेने क्षणी शांत होता नव्याने पुन्हा तृप्तता शोधणे


नभी उंच उत्तुंग घे तू भरारी दिशा मोकळ्या आज दाही तुला

जरी बंद झाल्या तुझ्या पायवाटा नको थांबवू तू तुझे चालणे


कधी काळ थांबे न कोणाच साठी घड्याळास  नाही विसावा इथे

सवे भाग्य प्रारब्ध सुद्धा नसावे तरी तू जगा सोबती चालणे


पिले दूर गेली विदेशी रहाया घरे दार भिंती मुक्या जाहल्या

सणाला गळा दाटतो आठवांनी उगा उंबऱ्याशीच रेंगाळणे


जगाने धरावे जिला काळजाशी अशी एक मजला सुचावी गझल

जणू शायरीतून साकारणारे नवे स्पंद व्हावे अती देखणे 


अलका कुलकर्णी

नाशिक

मोबा : 9850253351

 

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments