• गझल प्रभात •
🌹 स्त्री 🌹
बोचरी सल खोल माझ्या आत आहे
आजही बाई दिव्याची वात आहे
लावते खांद्यास खांदा काम करते
वाटते की टाकलेली कात आहे
झाकते मोठ्या खुबीने वेदनेला
जाळणारी काळजी पदरात आहे
हासते बाहेर खोट्या मुखवट्याने
वेदनेचे गीत मन का गात आहे
बांधते घरटे नव्याने मोडलेले
झेप घेते बळ तिच्या पंखात आहे
अंतरी स्त्री संयमी अन् शांत भासे
पेटता लाव्हा तिच्या मौनात आहे
डॉ. अंजना भंडारी
नाशिक.
9921383416
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments