• गझल प्रभात •
🌹खुले अवकाश मी झाले🌹
तिने डोळ्यात स्वप्नांना उगाचच पाहिले नाही
निवडली वाट काट्यांची फुलांना माळले नाही...
पुन्हा आली कशी भरती पुन्हा होडी किनाऱ्याला
कितीदा वादळे आली तरी मी थांबले नाही...
कपाळी आडव्या रेषा प्रयत्नांनी उभ्या केल्या
पुढे गेले पुन्हा मागे वळावे वाटले नाही...
पतंगाचे उडत जाणे तशी मी उंच आकाशी
जरी वारा धडकलेला मनाने फाटले नाही...
भरारी घेत गेले अन् खुले अवकाश मी झाले
भरजरी पंख हे माझे कुणीही छाटले नाही...
स्मिता बनकर(सिम)
नाशिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments