• गझल प्रभात •
🌹महिला दिन विशेष 🌹
🌹विश्वाचे घर खुलेच असते!🌹
कुठल्याही प्रश्नाला उत्तर हवेच असते
प्रत्येकाचे उत्तर पण वेगळेच असते!
रंग संगती अचूक केल्यावर हे कळते
चित्र नेमके अर्थपूर्ण बोलकेच असते!
नक्की ठरवा बेत चांगले मनात तुमच्या
पण नियतीच्या मनामधे वेगळेच असते!
सख्य केवढे दोघांच्याही मधे नांदते
ऊन्हातही सावली उन्हाच्या सवेच असते!
एक हातची जरी पाचही बोटे असती
प्रत्येकाचे बाह्य रूप वेगळेच असते!
सन्याशाला गरज घराची कुठे भासते
विश्वाचे घर त्याच्यासाठी खुलेच असते!
माणुसकीचे वस्त्र नेसला तो वरवरचे
हिंस्त्र जनावर एक आत नागवेच असते!
शब्द नेमका योजावा लागतो कल्पना
मन कोणाचे दुखु नये एवढेच असते!
सौ. कल्पना गवरे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments