Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

स्वतःवर फक्त भाळू Gazalkara Alka Deshmukh

• गझल प्रभात •   



 🌹महिला दिन विशेष 🌹


🌹स्वतःवर फक्त भाळू 🌹


मनाचे घोळ अन् भांबावणे हासून टाळू...

कळेना मी कशी वागू? जगाची रीत पाळू ?


तुझ्या माझ्यात शब्दांचे असे हे खेळ झाले ..

कुणाला दूर लोटू .. अन् कुणाचे शब्द गाळू


जरी टळलीच माझी आज वारी पांडुरंगा

कशी भेटू तुला आता कधी होशिल कृपाळू..


जसे तू ठेवले आहे तसे राहून घेतो

तुझी सप्रेम आहे भेट मानत दुःख माळू...


स्वतःचे आरश्यातुन जे दिसे प्रतिबिंब पाहू

जगाचे सांगणे टाळू... स्वतःवर फक्त भाळू


अलका देशमुख


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments