• गझल प्रभात •
![]() |
गझलकारा सोनल गादेवार |
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹खऱ्यावाचून खोट्याचे फळत आहे🌹
खऱ्यावाचून खोट्याचे फळत आहे
कशी दुनिया खुळी झाली पळत आहे
नसावा खेद ना इर्षा मनामध्ये
पुढे जाणे कुणाचे का छळत आहे
कुठे उरली नजर त्यांची अता निर्मळ
विचारांची दिशा जर ढासळत आहे
उभ्या त्या बाभळीचा देह तळमळतो
उन्हामध्ये अशी ती का जळत आहे
किती लावा बसत नाही वरुन औषध
जखम आतून जर का भळभळत आहे
स्वकष्टाने उगवतो.. तो खरे मोती
तरी ना मोल त्याचे पण मिळत आहे
बदल घडणे निसर्गाचा नियम आहे
स्वभावातील बदलांनी कळत आहे
युगापाठी युगे सरलीत भगवंता
तुझी गाथा जगाला आकळत आहे
कुठेही शोधुनी मुक्ती मिळत नाही
शिवाच्या प्रार्थनेला मन वळत आहे
सौ. सोनल मनोज गादेवार
यवतमाळ
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments