Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पेटून बोलतो मी Gazalkar Pandurang Kulkarni

• गझल प्रभात •   

पेटून बोलतो मी


🌹पेटून बोलतो मी🌹


अन्याय पाहिल्यावर पेटून बोलतो मी
न्यायास टाळल्यावर सौजन्य सोडतो मी ...

त्यांचाच बोलबाला त्यांचेच गीत गावे
या राजकारण्यांच्या मंत्रास मोडतो मी...

न्यायास साथ मिळता आनंद वाटतो पण 
अन्याय पाहिल्यावर तात्काळ तापतो मी..

कर्तव्य पाळताना सौख्यात डौलतो अन 
परमार्थ नित्य घडतो  मौनात बोलतो मी...

ताटातुटीस जेंव्हा सुरुवात होत असते
उठते मनात वादळ  भरपूर त्रासतो मी...

सा-याच फोल शपथा खोट्याच का वहाव्या
ही न्याय मंडळाला शंका विचारतो मी...

पांडुरंग कुलकर्णी
नाशिक 
 
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments