Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन-gazal manthan

 जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन

जळगावात रविवारी खान्देश विभागीय एकदिवसीय गझल संमेलन


 नामांकित ७० गझलकार उपस्थित राहणार



 जळगाव, (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे जळगाव येथे रविवार दि. १० मार्च रोजी खान्देश विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलन आयोजित केले आहे. जळगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील हे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. सुप्रसिद्ध गझलकार डॉ. शिवाजी काळे (राशीन जि. अहमदनगर) हे उद्घाटक तर सुप्रसिद्ध गझलकार निलेश कवडे (अकोला) हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाला सुमारे ७० नामांकित गझलकार उपस्थित राहणार आहेत.

     गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केले जात आहेत. जळगाव येथे रविवार दि. १० मार्च रोजी खान्देश विभागीय गझल संमेलन होत आहे. या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकार सतिश दराडे, संदीप वाकोडे, सच्चिदानंद जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. गझलकार डॉ. कैलास गायकवाड, विजय वडवेराव, रावसाहेब कुवर, विजय पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, वीरेंद्र बेडसे हे नामांकित गझलकार विविध सत्रात संपन्न होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तर गझलकार राज शेळके, संदीप पटेल, डॉ. कुणाल पवार, छाया सोनवणे, आशा साळुंके, ज्योती वाघ हे मुशायऱ्याचे सूत्रसंचालन करतील.

या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ७० गझलकार सहभागी होणार आहेत. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

     संमेलनात जळगावचे कवी ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांचा "फुलला सुगंध प्रेमाचा.." या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. प्रेम या एकाच विषयावर आधारित विविध ९५ कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे. या संग्रहाला उर्मिला बांदिवडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

     हे गझल संमेलन दि. १० मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जळगाव येथील व. वा. जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, खान्देश विभाग अध्यक्ष काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष अॅड. मुकुंदराव जाधव, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले आहे.

________________________

भरत माळी

प्रसिद्धी प्रमुख

गझल मंथन साहित्य संस्था (रजि.)

मो. 9420168806 

Post a Comment

0 Comments