• गझल प्रभात •
🌹तर काय झाले🌹
शौक थोडा मज फुलांचा, वाटला तर काय झाले..
अमृताचा गोडवा मी, चाखला तर काय झाले ?
घेतली लावून दारे, तू तुझ्या मर्जीप्रमाणे..
वेगळा मी मार्ग माझा, शोधला तर काय झाले ?
चक्क खोट्याचा सहारा, घेतला तू ऐनवेळी..
मात्र दावा तो तुझा मी, खोडला तर काय झाले ?
आव खोटा आणण्याची, फार मोठी हौस तुजला..
मुखवटा नकली तुझा मी, फाडला तर काय झाले ?
वसवली लंकापुरी तू , केवढा कैफात आला..
तुज कुणी 'रावण' म्हणाया, लागला तर काय झाले ?
केवढा हा दांभिकांचा, चालला हैदोस सारा..
ज्यास त्याच्या लायकीने, कांडला तर काय झाले
ठेवला विश्वास ज्यावर, तोच करतो घात तर मग..
अस्तनितला तो निखारा, खांडला तर काय झाले ?
तु. सी. ढिकले
मो. 7588828834
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments