Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

ती Gazalkara Nisha Chausalkar

• गझल प्रभात •  



🌹वाढदिवस विशेष 🌹


 🌹ती🌹


स्वप्नामधले जगण्यासाठी व्याकुळलेली ती आहे

पंख आपुले स्वतः छाटुनी घुसमटलेली ती आहे


देशासाठी अर्पण केले तिने आपुल्या पुत्रांना

शहिदांना त्या जात लावता धगधगलेली ती आहे


तिने घेतले पंखाखाली वादळामधे पिल्लांना

वादळ शमता मातीमध्ये बरबटलेली ती आहे


उदरामध्ये कुंदकळी जी वाढत आहे हळूहळू 

स्पर्श रेशमी तिचा व्हावया आसुसलेली ती आहे


कुठेच नाही चुकली किंवा मिरवत नव्हती देहाला 

हपापलेल्या नजरांनी पण घाबरलेली ती आहे


स्वातंत्र्याची जरी कवाडे दिली मोकळी सहज तिला

मोहामध्ये अजून कुठल्या गुरफटलेली ती आहे


असताना ती कळले नाही गुपित नेमके गंधाचे

कणाकणाने घरात अवघ्या दरवळलेली ती आहे


सौ. निशा चौसाळकर 

अंबाजोगाई

मो. 7798095711


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments