• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹कोडे झाले🌹
एखादे नाते दरदिवशी सोपे झाले..
एखाद्या नात्याचे निव्वळ कोडे झाले!!
असंख्य कविता डोळ्यांमध्ये तुझ्या वाचल्या!!
एकच कळली अन् दिवसाचे सोने झाले!
एक योजना शिजली तिकडे शहरामध्ये
इकडे एका गावाचे वाटोळे झाले!!
गैरसमज झाला सगळ्यांचा अन् माझाही
(अरे कुठे मन वयाबरोबर मोठे झाले !!?)
दोष तुझा माझा नव्हता पण इलाज नव्हता!!
शब्द नेमके आपलेच वांझोटे झाले!!
जे शिकलो ते यामुळेच तर शिकता आले
खरे मानलेले मी सगळे खोटे झाले!!
दत्तप्रसाद जोग
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments