Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शिकवले याच मातीने Gazalkara Sujata Nimbalkar

• गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹शिकवले याच मातीने 🌹


 जरी तू सोडवू शकतोस काही प्रश्न चुटकीने 

मिळत नसतात सारी उत्तरे तितक्याच सहजीने 


हवाली लेक केली आज त्यांच्या, खूप लाडाची 

खरे तर काळजाला वेगळे केलेय आईने 


उगाचच सोसले गर्भारपण देहात बाईने 

मुले जर का करत नसती तिची जपणूक सलगीने 


समंजस मी तशी नाही कुणी उद्दाम झाल्यावर 

जिवाच्या माणसांशी वागते मुद्दाम नरमीने 


तिने स्वीकारले नेतृत्व सळसळत्या विजांचेही 

लढा शत्रूस देणे तर शिकवले याच मातीने 


सौ सुजाता निंबाळकर


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments