• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹समाधान नाही..🌹
रुते शूल पायी जरी रान नाही
कसे जीवनी या समाधान नाही
फुले हार टाळ्या मिळे बेइमाना
खरे बोलण्याला असा मान नाही
किती दाट गर्दी असे भोजनाला
भिकाऱ्यास सांगे अरे पान नाही
जरा घाम गाळून मित्रा बघावा
असे आयते बोलने छान नाही
गरीबास तू पुस्तके दे जराशी
दुजे या जगी चांगले दान नाही
देवेंद्र जोशी
यवतमाळ
मो. 9822729855
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments