Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

समजत नाही Gazalkar Sachin Inamdar

• गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹समजत नाही 🌹


गुपित मनीचे कोठे दडले समजत नाही

असे कुणाच्या मनात लपले समजत नाही


भटकत फिरतो एकटाच मी रानोमाळी 

कुठे मिळावे पण मनातले समजत नाही


कशा कशाचे शल्य मनाला सलते आहे 

जखमा सुकल्या व्रण,का उरले समजत नाही


विसरून जा ते असे म्हणाया सोपे आहे 

तरी जुन्यावर मन का जडले समजत नाही


मनास देतो सदा दिलासे लढावयाचे

बुद्धा स्मरता युद्धच सरले समजत नाही


धरती सजते वसंत येता पुन्हा एकदा

तिने उन्हाळे कसे सोसले समजत नाही 


अभिनंदन ते करती आता पुन्हा पुन्हा  

सचीनला का पूर्वी छळले समजत नाही


सचिन इनामदार

कोल्हापूर

मो. 9764878727


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments