• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹काटा जपला फुलाप्रमाणे🌹
नाकासमोर कुठवर चालू जगाप्रमाणे
थोडे जगून घेतो माझ्या मनाप्रमाणे
देऊ कसा कुणाला आधार सावलीचा
आयुष्य पेलले मी चढत्या उन्हाप्रमाणे
ती दाखवीत गेली नुसते मळभ धुक्याचे
बरसून रिक्त झालो मी श्रावणाप्रमाणे
माझ्या खुळेपणाची बस एवढी कहाणी
हृदयात एक काटा जपला फुलाप्रमाणे
तू सोडशील केंव्हा गझले हळूच पान्हा
आशाळभूत बघतो मी वासराप्रमाणे
दिवाकर जोशी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments