• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹जमेल का तुला पुन्हा वसंत व्हायचे🌹
मला न भावले तुझे असे निघून जायचे
बनून रात वादळी पुन्हा मिठीत यायचे
अजाणतेपणी तुझ्यात श्वास गुंतले प्रिये
नकार देत का उगा सख्यास या छळायचे
पहा विझून चालल्या थकून सर्व तारका
नशेत यौवने तुझ्या अता हळू बुडायचे
दशेत कोणत्या तरी गमावले सखे तुला
नि प्राक्तनात राहिले क्षणोक्षणी कुढायचे
विराण जाहले ऋतू तुझ्याविना मनातले
जमेल का तुला पुन्हा ऋतू वसंत व्हायचे
काशिनाथ गवळी
नांदगाव, नासिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments