• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹प्रेम दगा देणाऱ्यासोबत करतो 🌹
बरोबरी ना कुठल्या केऱ्या नाऱ्या सोबत करतो
तुलना माझी मी चमचमत्या ताऱ्यासोबत करतो
मी मन, माझ्या वेगाचा अंदाज कुणाला कळला?
स्पर्धा मी तर प्रकाश आणिक वाऱ्यासोबत करतो
खंजर, चाकू, सजनी, दुनिया खजील झाले सगळे
प्रेम तसे मी दगा मला देणाऱ्यासोबत करतो
हेतू हा की तीन पिढीला जोडत जावे आपण
गप्पा गोष्टी मुलांसवे म्हाताऱ्यासोबत करतो
बाग बहरता गंधफुलांनी अलगद मोहळ बसते
कळते मैत्री जो तो दरवळणाऱ्या सोबत करतो
पळणाऱ्याला चव कष्टाची कधीच समजत नाही
म्हणून थट्टा मृत्यूही लढणाऱ्यासोबत करतो
मनात नसतो राग द्वेष ना मत्सर यशवंताच्या
मंगल मैत्री मी तर साऱ्यां साऱ्यासोबत करतो
यशवंत मस्के
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments