Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

स्वप्नांचा कसा व्यापार करता Gazalkara Sunita Kambale

• गझल प्रभात •  

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹 स्वप्नांचा कसा व्यापार करता 🌹


माणसांचा तेवढा धिक्कार करता

पत्थरांचा मात्र जयजयकार करता


कत्तली विज्ञानवादाच्या करुनी 

अंधश्रद्धांचा तुम्ही सत्कार करता


लावता नुसते दिवे दगडांपुढे अन्

नेमका डोक्यामधे अंधार करता 


मानता मातेपरी प्रत्येक नारी

पण तिच्यावर रोज अत्याचार करता


व्यर्थ पोकळ, घोषणांच्या भाषणांनी 

का बळीची जिंदगी बेजार करता


आपली भाजून पोळी जाहल्यावर

कामगारांना पुन्हा बेकार करता


भेटता खोके तुम्ही बैमान होता 

देत खो कोणासही सरकार करता...


लाच घेता नोकरीची आस देता 

छान स्वप्नांचा कसा व्यापार करता



सौ. सुनीता कांबळे 

उमरखेड, यवतमाळ


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments