Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

संशयास्पद Gazalkara Deepali Kulkarni

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹संशयास्पद🌹


वाटते आता खरेही...संशयास्पद

वागणे झाले तुझेही...संशयास्पद


चेहरा माझा कुठे पाहू कळेना?

भोवतीचे आरसेही...संशयास्पद


प्रेम असल्याचा पुरावा द्यायचा तर

आज नाते आपलेही...संशयास्पद


त्या खुनाला सिद्ध केले...'आत्महत्या'

मिटविले गेले ठसेही...संशयास्पद


प्रेम आपुलकी जिव्हाळा शोधल्यावर

का जवळची माणसेही...संशयास्पद


वाटणी दोघात झाली का अचानक?

आखले गेले धुरेही...संशयास्पद


भेटली संधी.. बदलले स्वार्थसाधू

घडविलेले मावळेही...संशयास्पद


दिपाली कुलकर्णी

देगलूर जि. नांदेड

मो. 7798283421


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments