Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पडली खळी गालांवरी Gazalkara Amruta Amol

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹पडली खळी गालांवरी🌹


सांगायला बोलायला ऐकायला आलो जरी

नाकावरी जो राग तो जाईल का सांगा तरी


सलते मनी काही तुझ्या तू बोल ना माझ्या फुला

मज ना कळे ही का अशी कोमेजली माझी परी


लपला कुठे झाकोळला तो चांदवा तुज पाहुनी

सांगू कसे तुजला सखे तू चांदणी माझी खरी


सोडून दे रुसवा तुझा तू ये अशी जवळी जरा

आता नको दोघांमधे ही अंतरे अन् ही दरी


पाहून त्याला हासली अन् लाजली खुलली कळी

हलकेच पडली मग खळी त्या गोरट्या गालांवरी


अमृता अमोल 


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments