Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नांगराचा फाळ होतो Gazalkar Dr Renukadas Bharaswadkar

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹नांगराचा फाळ होतो🌹


वाजताना हात माझा टाळ होतो

आतमध्ये वासनांचा जाळ होतो |


हासलो नाही कधीही एकट्याने

मी मिराच्या पाउलांचा चाळ होतो |


या सुखाचे भोवताली पाश होते

मी तसाही  किर्तनाचा थाळ होतो|


भोवताली रान सारे पेटलेले

घट्ट पायाने उभा मी माळ होतो |


दगड झालेल्या मनाला खोदताना

रोज येथे नांगराचा फाळ होतो |


प्रा. डाॅ. रे. भ. भारस्वाडकर 

छ. संभाजीनगर 

मो. 9730093331


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments