Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलेत उरणार आहे मी Gazalkara Sunetra Joshi

• गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



  🌹गझलेत उरणार आहे मी 🌹


तुझ्यावाचून  जगुनी कैकदा  मरणार आहे मी

तुझ्या ह्रदयात नसले तर कुठे असणार आहे मी


मिसळ माझी तिथे मातीत थोडी राख देहाची

तुझ्या बागेतल्या झाडांवरी फुलणार आहे मी


जरी नसले दिसत आता तुझ्या नजरेस शेजारी 

जरा आकाश बघ ता-यांमधे  दिसणार आहे मी


नको व्याकूळ होऊ आठवण येता कधी माझी

तुझ्या हसण्यातुनी आता तिथे हसणार आहे मी


तुझ्या नावासवे माझे असावे नाव जुळलेले 

तुझ्यासाठीच  नियतीशी अता लढणार आहे मी


असे काही झरावे लेखणीमधुनी जगासाठी

जरी गेले तरी गझलेत त्या उरणार आहे मी


सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments