Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

जन्मात Gazalkar Ashok Wadkar

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹 जन्मात 🌹


चांदणे मंद प्रेमाचे लाभता हुरळलो नाही

जन्मात हारलो तेव्हा मी मुळी कचरलो नाही


सूर्योदय पूर्व दिशेचा मज सदाच भुलवत राही

अंबरी फिक्या रंगाच्या मी कधी गुंतलो नाही


जाळ्यात तुझ्या फासाच्या मी मीपण हरवुन बसलो

त्यातून कधीही नंतर मी मुक्त जाहलो नाही


पदव्यांचे भेंडोळे मी केव्हाचे जपतो आहे

शोधात नोकरीच्या मी धावणे विसरलो नाही


मैत्रीला जागत गेलो, ना कधी दंभ पांघरले

जन्मात कधीही फसव्या, ढोंगात गुंतलो नाही




अशोक म. वाडकर 

कोल्हापूर

                         मो.7020011408


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments