Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

विठोबा शिंगरू मेले Gazalkar Chandrakant Dhas

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹विठोबा शिंगरू मेले..🌹


 असा का खेळ मांडावा जगाच्या 'त्या' मदाऱ्याने?

इथे प्रत्येकजण जगतो जिवाच्या कोंडमाऱ्याने 


तळागाळातला आहे, असावा दोष का माझा?

कुणी माझे करावे मोल का इतक्या घसाऱ्याने?


पुऱ्या झाल्या कधी इच्छा निखळलेल्याच ताऱ्याच्या?

कशी इच्छा तुझी पुरवायची विमनस्क ताऱ्याने? 


कसे कन्येस उजवावे? जिवाला घोर बापाच्या

खिसे भरले पुढाऱ्याचे बळीच्या शेतसाऱ्याने


म्हणाया गाव मामाचा, नसे कोणीच कामाचा

जगावे माणसाने का कुणाच्याही सहाऱ्याने?


सुखाची झोप लागेना किती चिंता कुबेराला

"नको चिंता उद्याची" हे शिकवलेले भिकाऱ्याने 


तुझ्यापासून आलो, जायचे आहे तुझ्यापाशी

विठोबा,"शिंगरू मेले उगीचच येरझाऱ्याने!"


चंद्रकांत धस

निगडी, पुणे

मो. ९९७०४५२५२५


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments