Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना ‘गझल सोबती’ पुरस्कार प्रदान

 उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना

 ‘गझल सोबती’ पुरस्कार प्रदान 




मुंबई, दि. १९ गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना ‘गझल सोबती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘गझल मंथन’ साहित्य संस्थेच्या दुसर्‍या अखिल भारतीय महिला गझल संमेलनात ‘गझल सोबती’ पुरस्कार उद्योजक डॉ. कौतिक दांडगे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. 

     याप्रसंगी डॉ. सुनंदा शेळके, ममता सपकाळ, हेमलता पाटील, डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रमोद खराडे डॉ. कैलास गायकवाड, प्रणाली म्हात्रे, मनोज वराडे, प्रदीप तळेकर आदी उपस्थित होते.

     सर्वसामान्य जनतेला कष्टकऱ्यांना स्वस्तात घरगुती सामान व इतर साहित्य मिळावे म्हणून ‘महाराष्ट्र बाजार पेठे’ ची स्थापना करून एका सामान्य कुटूंबातून आलेल्या डॉ. कौतिक दांगडे यांनी गरूडझेप घेत कष्टाने नाव कमावले. उद्योगरत्न म्हणून आज त्यांचा सर्वत्र सन्मान होत आहे. 

एका शेतकरी वारकरी कुटूंबात संभाजीनगर, बाळापूर येथे १८ जून १९७५ रोजी जन्मलेल्या डॉ. कौतिक दांडगे यांचे शालेय शिक्षण गावीच झाले. नंतर अकरावी, बारावी संभाजीनगर येथे झाले. लहानपणापासून कष्ट करण्याची जिद्द असलेल्या दांडगे यानी आपल्या वडिलांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय करून कुटूंब चालवण्याची कला आत्मसात करून सुरुवातीला बेकरीतून पाव आणून विकले, नंतर असेच छोटे मोठे काम करत कॉलेज करत हॉटेल मध्ये काम करून मालकाचा विश्वास संपादन केला.

पुढे मॅनेजर पदावर रुजू होऊन त्यांनी मोठी गरूडझेप घेतली. आपल्या कुशल कार्यामुळे त्यांच्या हाताखाली १५ ते २० कामगार सांभाळत होते. उद्योग व्यवसाय करण्याची मिळालेली जिद्द उराशी बाळगून मुंबई नगरीत आपलं नशीब आजमवण्यासाठी आल्यानंतर सुरुवातीला नोकरी केली. नंतर त्याच कंपनीचे सी.ई.ओ पदी विराजमान झाल्यानंतर मार्केटिंग करताना आलेला अनुभव त्यातून स्वतःबरोबर गोरगरिबांना स्वस्तात घरगुती सामान उपलब्ध करून देण्याचा केलेला संकल्प साक्षात उतरवण्यासाठी २०१७ मध्ये ‘महाराष्ट्र बाजार पेठे’ची स्थापना दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी केली.

‘महाराष्ट्र बाजार पेठे’ची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला डॉ दांडगे यानी हा व्यवसाय महिलांना समर्पित केला होता त्यानुसार महिलांना एकत्रित करत हळूहळू व्यवसाय वाढवत पुढे सुपर मार्केट च्या धरतीवर सुरुवातीला १०० महिला, पुढे हजार त्यानंतर हजारोच्या ५० हजार महिला या महाराष्ट्र बाजार पेठेशी जोडल्या गेल्या आहेत. या बाजार पेठेत आलेल्या महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रक्षाबंधन, भाऊबीज, जागतिक महिला दिन, त्याचबरोबर त्यांना कुटूंबापासून वेगळे होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी नृत्य, प्रश्नमंजुषा, महिलेसाठी विशेष पिकनिक सारखे कार्यक्रम भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात येत असल्याकारणामुळे महिलांचा सहभाग वाढतच आहे. जून २०१७ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र बाजार पेठेचा हा व्यवसाय मोठा होत गेला असून आता दशकपूर्तीकडे त्याची वाटचाल सुरू आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून समाजाला आपण काही तरी देणं लागतो, या उदेशाने आपण इतरांचे पुरस्कार स्वीकारतो असेच आपणही दुसऱ्याऱ्यांना दिले पाहिजेत म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असते.

उद्योगरत्न डॉ. कौतिक दांङगे याना या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असले तरी अलीकडेच त्यांना अनेक संस्थांनी गौरवले आहे. आजचा हा गौरव सोहळा नक्कीच त्यांच्या यशाचे प्रतिक आहे. अनेक संस्था, समस्त बाजार पेठेसोबत जोडलेल्या महिलांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले होते. डॉ दांडगे यांचे हे ध्येय खूप मोठे आहे पुढील दोन वर्षात मुंबईत ५ सुपर मार्केट सुरू करण्याचा संकल्प आहे. त्याही पुढे जाऊन महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात अशी सुपर मार्केट सुरू करून गोर गरीब जनतेला अगदी कमी दरात आपल्या घरचे सर्व सामान उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांच्या या स्वप्नाला बळ मिळावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करून उद्योगरत्न डॉ कौतिक दांडगे यांच्या कार्याची व्याप्ती आणखीनच वाढेल अशा शुभेच्छा देऊन त्यांना या निमित्ताने उदंड आयुष्य मिळो, उत्तम आरोग्य मिळो हीच सदिच्छा.



Post a Comment

0 Comments