• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
केंद्र वर्तुळाचे आत्म्यास आठवेना
आरंभ आकळेना की अंत आकळेना
ह्या दिर्घ नाटकाचा उद्देश सापडेना
कुठल्या परंपरेचे जू वाहतोय आम्ही
बापास ना कळाले पोरासही कळेना
मिसळून पाहिला मी शाईमधेच अश्रू
पण भार वेदनेचा शब्दांस पेलवेना
भाऊ अम्हांस तुमची अडचण नवीन नाही
खूर्चीपुढे तुम्हांला काहीच बोलवेना
खपली जुन्या स्मृतीची काढून रोज बघतो
आजन्म कोणती सल मेंदूस सोडवेना
कित्येक जन्म वेडा परिघावरी भटकला
पण केंद्र वर्तुळाचे आत्म्यास आठवेना
दिगंबर खडसे
अकोट, अकोला
गझलकार दिगंबरजी खडसे यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments