Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

भाग्यास तू आखून घे इथे Gazalkara Madhuri Barve

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹भाग्यास तू आखून घे इथे🌹


नाही कुणी कुणाचे जाणून घे इथे 

ते सत्य जीवनाचे समजून घे इथे 


साऱ्या नव्या अपेक्षा घेऊन जा पुढे 

होतील पूर्ण त्यांना झेलून घे इथे 


नाण्यास दोन बाजू आहे नियम जुना 

वागायचे कसे ते ठरवून घे इथे 


रेषा जरी कितीही हातावरी बऱ्या 

भाग्यास आपल्या तू आखून घे इथे 


संतांमुळेच मिळते उपयुक्त ज्ञान ते 

ज्ञानामृतास त्या तू वेचून घे इथे 


सौ. माधुरी बर्वे


 गझलकार माधुरीजी बर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments