Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

ही दुनिया माझी नाही Gazalkar Alpana Deshmukh Nayak

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



🌹ही दुनिया माझी नाही🌹


मी फक्त तुझी म्हणणारी ही दुनिया माझी नाही

हृदयाचा तळ बघणारी ही दुनिया माझी नाही


ती अर्थ लावते आहे सारेच तिला पटणारे

अपुलेच खरे करणारी ही दुनिया माझी नाही


कुठलाच सूर दुनियेशी जुळणारा नाही माझा

सगळ्यांना आवडणारी ही दुनिया माझी नाही


ही चंद्र सूर्य ताऱ्यांची आरास जरी झगमगती

पण तुझ्याविना असणारी ही दुनिया माझी नाही


मी भाग तिचा आहे पण ती मला ओळखत नाही

भवताली आढळणारी ही दुनिया माझी नाही


पाहून रोख वाऱ्याचा जी दिशा ठरवते अपुली

सोडून साथ पळणारी ही दुनिया माझी नाही


केव्हाच दुःख ती अपुले बोलून दाखवत नाही

माझ्यात असुन नसणारी ही दुनिया माझी नाही


अल्पना देशमुख-नायक


 गझलकारा अल्पनाजी देशमुख-नायक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments