• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹समजली ती..🌹
खूप झाल्यावरी समजली ती..
दुःख प्याल्यावरी समजली ती
एक होती जखम जुनी बहुधा
रक्त आल्यावरी समजली ती
मी तिचा माग काढला होता..
तो निघाल्यावरी समजली ती
मज नको ऐकवू तुझी गीते
हे म्हणाल्यावरी समजली ती
बॅग भरली निघून गेली अन्..
दूर झाल्यावरी समजली ती
प्रमोद खराडे
ज्येष्ठ गझलकार प्रमोददादा खराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments